TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, July 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, July 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

TwinCity News by TwinCity News
May 19, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


चौकशी अहवालातून धक्कादायक वास्तव समोर; १७ उपसूचना अवैध, तरीही जबाबदारांवर कारवाई नाही

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा


पिंपरी, दि. १९ मे २६ – पिंपरी-चिंचवड मनपातील तब्बल ६० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असला, तरी या संपूर्ण व्यवहाराला मंजुरी देणारे नगरसेवक आणि बिले उचलणारे ठेकेदार मात्र अद्याप कारवाईपासून दूर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे “मनपात निवडकांनाच बळीचा बकरा बनवले जात आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे.

मनपाच्या चौकशी अहवालानुसार  सन २०२५-२६ आर्थिक वर्षात  २४ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत अंदाजपत्रकीय तरतुदींमध्ये परस्पर वाढ-घट करून विकास कामांची बिले मोठ्या प्रमाणावर अदा करण्यात आली. या प्रक्रियेत अनेक उपसूचना नियमबाह्य पद्धतीने सादर झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, लेखा विभागाकडून एकूण २० उपसूचना सादर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ ३ उपसूचना वैध ठरल्या, तर तब्बल १७ उपसूचना अवैध असल्याचे नगरसचिव विभागाने स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यापैकी १४ अवैध उपसूचनांच्या आधारे सुमारे ६०.१८ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याचे चौकशी अहवालात नमूद आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या आर्थिक व्यवहारानंतरही संबंधित ठेकेदारांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच या उपसूचनांवर सह्या करणाऱ्या नगरसेवकांची जबाबदारीही निश्चित करण्यात आलेली नाही. यामुळे संपूर्ण चौकशी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, अनेक उपसूचना स्थायी समिती किंवा महासभेपुढे सादरच करण्यात आल्या नव्हत्या. काही प्रस्तावांना प्रशासन स्तरावरच मंजुरी देण्यात आली. परिणामी आर्थिक शिस्त आणि नियमांची पायमल्ली झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
याशिवाय चौकशीत मुदतठेवी बँकांमध्ये ठेवत असता पालिकेस तोटा होईल अशा पद्धतीने ठेवल्याचेही समोर आले आहे. या प्रक्रियेमुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे व्याज नुकसान झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. बँक व्यवहार, निधी वर्गीकरण आणि बिल अदा प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचेही चौकशीत अधोरेखित करण्यात आले आहे.
दरम्यान, “फक्त अधिकाऱ्यांवर कारवाई आणि राजकीय मंडळींना अभय” अशी चर्चा आता मनपा वर्तुळात रंगू लागली आहे. घोटाळ्यात सहभागी सर्व नगरसेवक, संबंधित विभाग प्रमुख आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Tags: 60koti ghotalaPCMpimprichinchwadpravinjain
ShareSendTweet
Previous Post

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

Next Post

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
Next Post

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तिजोऱ्या फोडल्याच, ठेवीही मोडल्या !
उधळपट्टीत चढाओढ,’श्रीमंती’ला ग्रहण !

June 30, 2026

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews