TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, July 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, July 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

प्रभाग ९ – स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याचा गांधीनगर–खराळवाडी प्रभागातील सर्वपक्षीय इच्छुकांचा ठराव

TwinCity News by TwinCity News
November 20, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी,  प्रभाग क्रमांक ९ गांधीनगर–खराळवाडी (अनुसूचित जाती राखीव) येथील समविचारी तसेच आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये रस असलेल्या सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची तातडीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडली. बैठकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर प्रभागातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आणि निवडणूक तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली.

गेल्या १८ वर्षांत गांधीनगर परिसराला स्थानिक नगरसेवक मिळालेला नसल्याने, या वेळी अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातून स्थानिक उमेदवाराला संधी मिळणे आवश्यक असल्याचे मत बहुसंख्य उपस्थितांनी व्यक्त केले. स्थानिक नेतृत्वाला पुन्हा पुढे येण्याची संधी मिळाल्याने इच्छुकांनी भावनिक मनोगत मांडत प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची भूमिका व्यक्त केली. सर्वच पक्षातील इच्छुकांनी आपल्या-आपल्या पक्षांकडून स्थानिक उमेदवारालाच तिकीट मिळावे, याबाबत एकमुखी मागणी करण्याचे ठरवले.

प्रभागातील पाणीटंचाई, शौचालयांची कमतरता, दुरावस्थित रस्ते, दिवाबत्तीतील त्रुटी, बेरोजगारी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी, विधवा आणि निराधार योजनांचे अपुरे लाभ यांसह प्रलंबित नागरी प्रश्नांवर सखोल चिंतन झाले. स्थानिक उमेदवार निवडून आल्यास हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लागतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

बैठकीत सर्वानुमते एक महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाने बाहेरील उमेदवाराला तिकीट दिल्यास त्याला मतदान न करण्याचा निर्णय एकमुखी घेण्यात आला. प्रभागातील एकता टिकवून ठेवून स्थानिक उमेदवारालाच संपूर्ण पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

निवडणुकीत कोणतेही आमिष, प्रलोभन, धमकी किंवा मतदारांना फितूर करण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत आणि अशा प्रयत्नांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली जाईल, याची स्पष्ट सूचना देण्यात आली. स्वच्छ, पारदर्शक आणि प्रामाणिक निवडणूक प्रक्रिया राखण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला.

बैठकीस अ‍ॅड. बी. के. कांबळे, काँग्रेसचे अ‍ॅड. उमेश खंदारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अ‍ॅड. धम्मराज साळवे, RPI चे दिलीप साळवे, कष्टकरी नेते बाबा कांबळे, RPI चे अजीज शेख, प्रल्हाद कांबळे, भाजपा तर्फे अ‍ॅड. दत्ता झुळूक, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत बोचकुरे, अजय शेरखाने, दीपक म्हेत्रे, गिरीश साबळे आणि निलेश काळे हे इच्छुक उमेदवार उपस्थित होते. तर लक्ष्मण कांबळे, हिराचंद जाधव, गणेश साळुंखे, धम्मा आचलखांब, सम्राट गायकवाड, राजन गुंजाळ, मनोज गजभार आणि रविभाऊ कांबळे यांसारख्या ज्येष्ठ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीमुळे प्रभागातील एकजूट दृढ झाली असून, स्थानिक नेतृत्वाबद्दलची नागरिकांची अपेक्षा आणि आत्मविश्वास अधिक वाढला आहे.

RELATED POSTS

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

Tags: baba kambleDhammraj Salavegandhinagarkharlwadirajendra salaveWard-9
ShareSendTweet
Previous Post

भाजपा शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती..!

Next Post

प्रभाग ११ च्या प्रारूप मतदार याद्यांतील धक्कादायक त्रुटींवर वंचित बहुजन युवा आघाडीची लक्षवेधी तक्रार

Related Posts

पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
Next Post

प्रभाग ११ च्या प्रारूप मतदार याद्यांतील धक्कादायक त्रुटींवर वंचित बहुजन युवा आघाडीची लक्षवेधी तक्रार

प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणा-या सूचनांची गांभिर्याने दखल घ्या - श्रावण हर्डीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026

तिजोऱ्या फोडल्याच, ठेवीही मोडल्या !
उधळपट्टीत चढाओढ,’श्रीमंती’ला ग्रहण !

June 30, 2026

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (177)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews